आपत्कालीन स्थितीमध्ये 'या' गोष्टी तुमच्याबरोबर असणे आवश्यक   

जेव्हा परिस्थिती बिकट होते त्यावेळी आपल्याला तयारी किती महत्वाची असते हे समजते. कोणत्याही आणिबाणीच्यावेळी या दहा गोष्टी तुमच्या बरोबर असणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्य वेगळ्या ठिकाणी असतील तर कोणत्या नियोजनाने एकत्र यावे ? यासाठी कोणती महत्वाची साधने तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. हे या आज आपण पाहूया. 
 
एखाद्यावेळी अचानक घरातून बाहेर पडण्याची वेळ येते त्यावेळी या दहा गोष्टींनी परिपूर्ण बॅग तुमची तयार असली पाहिजे. यामध्ये अगदी टॉर्च पासून ते बॅटरी ऑपरेटेड रेडिओ पर्यंत, फर्स्ट एड किटपासून महत्वाच्या कागदपत्रांपर्यंत सर्व काही तुम्हाला सुसज्ज ठेवावे लागते. ही माहिती प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे कारण एक सुसज्ज, सुजाण नागरिक म्हणून त्याचे हे कर्तव्य आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये स्वतःचा बचाव करता येणे आणि वेळप्रसंगी कुठेही स्थलांतरित होता यावे यासाठी खूप प्राथमिक पण महत्वाच्या गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजे. ही माहिती जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचवा यामुळे तुम्हाला सुसज्ज राहता येईल.   
 

- दिवे : पूर्ण चार्ज असलेली इमर्जन्सी दिवे किंवा बॅटरीज काही मेणबत्त्या. अतिरिक्त पॉवर बँक.  

- फर्स्ट एड किट : बँडेज, डेटॉल, अँटीसेप्टिक क्रीम, वेदनाशामक औषधे, लहान मुले असल्यास त्यांची वेगळी औषधांची पेटी करून तयार ठेवावी. ज्येष्ठ नागरिकांनी दैनंदिन लागणारी औषधे.    

- हायजिन किट : साबण,सॅनिटरी पॅड्स, सॅनिटाइजर,टूथपेस्ट,ब्रश, टॉयलेट पेपर, टिश्यू पेपर, पाण्याच्या शुद्धतेसाठी क्लोरीनच्या गोळ्या, 

- रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे : आधारकार्ड, पात्याचा पुरावा, बँक तपशील यांचा डिजिटल बॅकअप करून क्लाउड वर सुरक्षित ठेवावा. 

- गॅजेटसची तयारी : फोनचे चार्जर, पॉवर बँक नेहमी चार्ज ठेवावी. इमर्जन्सी नंबर एका खिशात ठेवता येईल अशा डायरीत लिहून ठेवा. 

- उपयुक्त साधने : काड्यापेटी, कात्री,पेन, सेफ्टी पिन, टॉर्च, सिलोटेप, आवश्यक गोष्टी एका छोट्या किटमध्ये तयार ठेवाव्यात.     

- ब्लॅकआऊट तयारी : जर ब्लॅकआऊट करण्याची वेळ आली आणि पडदे नसतील तर काळ्या चार्ट पेपरने खिडक्या झाका. जेणे करून कोणत्याही प्रकारच्या प्रकाशझोत बाहेर जाणार नाही. 

- बॅटरी ऑपरेटेड रेडिओ : वीज किंवा इंटरनेट नसतानाही माहिती मिळावी यासाठी रेडिओ तयार ठेवा. 

- लोकल मॅप : तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जवळच्या रुग्णालयात, पोलीस चौकीत किंवा मदत केंद्राचे स्थान माहित असले पाहिजे. 

- शांतात आणि सहकार्याची भावना : आवश्यक तितक्याच वस्तू ठेवा, गरजेपेक्षा जास्त साठा करू नका. यामुळे प्रत्येक नागरिकाला पुरेशा सुविधा मिळू शकतील. 

अफवांचे बळी ठरू नका, जागरूक राहा, संयम राखा आणि एकजूट दाखवा.  

 

Related Articles